खेड (प्रतिनिधी)
कोकण मार्गावरून धावणारी सावंतवाडी-दादर तुतारी एक्सप्रेस २८ मे ते २ जून या कालावधीत ठाणे स्थानकापर्यंत धावणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले. सीएसएमटी मुंबई रेल्वे स्थानकात सुरू असलेल्या कामांमुळे हा बदल करण्यात आला आहे. यामुळे १०१०४ क्रमांकाची सावंतवाडी-दादर तुतारी एक्सप्रेस दादर स्थानकाऐवजी ठाणे स्थानकापर्यंतच धावणार आहे. या बदलाची प्रवाशांनी नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे












