राजापूर (वार्ताहर): शहरातील धोपेश्वरघाटी येथील रहिवासी व मालपेकर परिवारातील ज्येष्ठ सदस्या श्रीमती अंजली विनायक मालपेकर (86) यांचे गुरूवार 30 मे रोजी सकाळी वृध्दापकालाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहे.
वृध्दापकालामुळे त्यांची प्रकृती बरी नव्हती. गुरूवारी सकाळी सात वाजण्याच्या दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच विविध क्षेत्रातील मंडळीनी मालपेकर कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केले.
प्रसिध्द सिने अभिनेत्री सविता मालपेकर व राजापूर अर्बन बँकेतील वरिष्ठ अधिकारी प्रसन्न मालपेकर व माजी नगरसेवक जितेन्द्र मालपेकर यांच्या त्या मातोश्री होत. माजी नगराध्यक्षा सौ. मिना मालपेकर यांच्या त्या सासू होत.
त्यांच्या पश्चात तीन विवाहीत मुली, दोन मुलगे, सुना सौ. वसुंधरा व सौ.मिना, नातवंडे असा परिवार आहे.
फोटो-कै. श्रीमती अंजली मालपेकर











