नदीच्या डोहातील मगरीचा बंदोबस्त करा मिर्ले तांबड ग्रामस्थ ची मागणी

खेड (प्रतिनिधी) तालुक्यातील मिर्ले तांबड हे गाव खेड तालुक्यापासून १८ किमी अंतरावर सह्याद्रीलगत वसले आहे या गावातून नदी वाहत असून नदीच्या डोहात मोठ्या प्रमाणात मगरी आढळून येत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे असून या मगरींचा बंदोबस्त करण्याची मागणी पालकमंत्री उदय सामंत यांच्या कडे करण्यात आली आहे
 मिर्ले गावात केंद्रीय प्राथमिक शाळा आहे या शाळेच्या पाठीमागे नदीचे पात्र असून मोठमोठे डोह आहेत. गावातील पुरुष व मुले या नदीत आंघोळीसाठी जातात तसेच कपडे धुण्यासाठी महिलांचा सततचा राबता या नदीच्या डोहाजवळ असतो गावातील गुरे-बकऱ्या सुध्दा पाणी पिण्यासाठी या डोहाजवळ येतात त्याशिवाय गणेश विसर्जन येथे केले जाते
मिर्ले गावातील नदीतील डोहात मगरीचे प्रमाण वाढत असल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे या मगरींकडून कोणतीही जिवितहानी किंवा प्राणीहानी होऊ नये यासाठी संबंधित विभागाने जातीने लक्ष घालून या नदीतील मगरींचा बंदोबस्त करावा अशी मागणी मिर्ले तांबड ग्रामस्थ मंडळ मुंबई (रजि) यांच्या वतीने अध्यक्ष दत्तात्रय नाना भोसले यांनी रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योग मंत्री श्री उदयजी सामंत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे