जगबुडी ने ओलांडली धोक्याची पातळी पावसाचा जोर वाढला

 

खेड(प्रतिनिधी) खेड मध्ये गेल्या आठवड्या पासून पावसाचा वाढलेला जोर कायम असून बुधवारी सकाळ पासून शहरासह ग्रामीण भागाला पावसाने झोडपून काढल्याने येथील सर्वच नद्या दुथड्या भरून वाहत असून जगबुडी नदीने पुन्हा एकदा ३ वाजण्याच्या सुमारास धोक्याची ७ मीटर ही पातळी ओलांडून ७.२० मीटर वर वाहत आहे यामुळे येथील प्रशासन सतर्क झाले आहे

आठवड्या पासून पावसाचा जोर कायम असल्याने शहरात पूर परिस्थिती निर्माण झाली होती मात्र त्या नंतर पावसा चा काहीसा जोर कमी झाल्याने पाण्याची पातळी घटली होती मात्र जगबुडी नदी इशारा पातळी ओलांडून च वाहत आहे बुधवारी सकाळ पासून च पावसाचा जोर वाढल्याने जगबुडी आता धोका पातळी ओलांडून वाहत आहे त्या मुळे शहरातील मटण मच्छी मार्केट नजीक पाणी आले आहे

दरम्यान,खेड शहरातील सर्व नागरीकांना व व्यापारी बांधवांना कळविणेत येते की पाऊस पडत असल्याने जगबुडी नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होत आहे.तरी नागरीकांनी व व्यापारी बंधूनी आवश्यक ती खबरदारी व दक्षता घेणेत यावी असे आवाहन देखील करण्यात आले आहे.