मांद्रे पोलिसांकडून आंतरराष्ट्रीय सेक्स ट्राफी किंग रॅकेटचा पर्दाफाश

पेडणे : निवृत्ती शिरोडकर

मांद्रे पोलिसांनी पोलीस निरीक्षक शेरीफ जॅक्स यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय सेक्स ट्रॉफी किंग रॅकेटचा पादार्फाश केला. उत्तर गोवा पोलीस अधीक्षक अक्षत कौशल्य यांनी दिलेल्या माहितीनुसार युगांडातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत आणि तरुण एका मातेला गोव्यातील रेस्टॉरंट आणि कॉफीमध्ये नोकरीचे खोटे आश्वासन देण्यात आले आणि भारतात आणल्यानंतर संशयिताने धमकावून त्यानंतर पासपोर्ट आणि व्हिजा बळजबरीने काढून घेतले. त्यांना हिंसाचाराच्या धमक्याखाली वेश्या व्यवसायात आणून लाखो रुपये लुटले. ग्राहकांना विनंती करण्यासाठी एक्सपोर्ट वेबसाईटचा ही फायदा घेत होता. तसेच हरमल येथे समुद्रकिनाऱ्यावर आणि रस्त्यावर ऑफलाईन उभे केले जायचे.

पेडणे पोलीस उपधीक्षक जीवबा दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार  एकाने दूतावासाशी संपर्क साधला आणि दूतावासाच्या मदतीमुळे गोवा पोलीस पिडीतांच्या ठिकाणापर्यंत पोहचू शकले.

मांद्रे पोलीस निरीक्षक आणि एनजीओ यांनी शोध घेत दोघांची सुटका केली. एका तस्कराला पकडण्यात यश आले. अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव ऋषी जोजो नाकीटू (३१) युगांडा राष्ट्रीय असून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सुटका केलेल्यांना मेरशी येथे अपना घर मध्ये पाठविण्यात आले.