तालुक्यातील प्रभानवल्ली गोसावीवाडी येथील घटना
लांजा (प्रतिनिधी) स्व मालकीच्या जागेत डोंगरावर लागलेला वणवा विझवण्यासाठी गेलेल्या ६५ वर्षीय व्यक्तीचा वणव्याच्या आगीत गोरपळून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील प्रभानवल्ली गोसावी वाडी येथे सोमवारी २३ मार्च रोजी दुपारी २.३० ते ४.४५ या कालावधीत पडली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लांजा तालुक्यातील प्रभानवल्ली गोसावीवाडी येथील विष्णू महादेव खेगडे (वय ६५) यांची प्रभानवल्ली गोसावी वाडी येथे डोंगरावर कटकी वरची जमीन येथे स्व मालकीची जमीन आहे. सोमवार दिनांक २३ मार्च रोजी दुपारी दोन-तीस वाजण्याच्या सुमारास त्यांच्या जागेत वणवा लागला होता. ही आग विझवण्यासाठी विष्णू खेडे हे त्या ठिकाणी गेले होते. ही आग विझवण्यासाठी ते प्रयत्न करत असताना या आगीमध्ये भाजून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
या घटनेची खबर त्यांच्या पत्नी वनिता विष्णू खेगडे (वय ६३) यांनी लांजा पोलिसांना दिली. लांजा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल दिनेश आखाडे हे करत आहेत.










