खेड(प्रतिनिधी) शहरातील एकविरा नगर येथे वास्तव्यास असलेल्या तरूणाची तब्बल २४ लाख ८५ हजार रूपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. शेअर मार्केट ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक न करता कंपनीत जादा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरूणाने पोलीस स्थानक गाठत तक्रार नोंदवली. त्यानुसार सोमवारी सायंकाळी उशिरा अज्ञातावर येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत विक्रांत विजय दांडेकर (४०, रा. एकविरा नगर, खेड) यांनी येथील पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. ही घटना १९ एप्रिल ते २४ मे या कालावधीत घडल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. तो फेसबुक अकाऊंट चालवत असताना शेअर मार्केट ट्रेडिंगची लिंक दिसली. त्या लिंकवर त्याने क्लिक केले असता व्हॉटस्अॅ प ग्रुपवर जॉईंट होण्यास सांगितले.
त्या नंतर ज्यादा परतावा मिळ न्याचे आमिषेला बळी पडत रक्कम भरण्यास टप्प्या टप्प्याने सांगुन तब्बल २४ लाख ८५ हजार रुपयांची फसवणूक झाली असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे









