आंबव पोंक्षे गावात भटक्या कुत्र्यांकडून बकऱ्यांवर हल्ला

पाच बकऱ्या ठार

माखजन |वार्ताहर : संगमेश्वर तालुक्यातील आंबव पोंक्षे गावात भटक्या कुत्र्यांनी उच्छाद माजवला आहे.सुमारे १५ भटके कुत्रे अचानक आंबव पोंक्षे गावात दाखल झाले आहेत.या कुत्र्यांनी येथील सुरेश जुवळे यांच्या मालकीच्या स्वतः चरायला घेऊन गेलेले असताना,बकऱ्यांवर हल्ला चढवला.या मध्ये ४ दिवसाच्या कालावधीत ५ बकऱ्या मारल्या गेल्या आहेत.यामध्ये सुरेश जुवळे यांचे मोठे नुकसान झाले आहे.या कुत्र्यांकडून कोंबडीही टार्गेट केली जात आहेत.अनेक कोंबडी मारली गेली असल्याचे ग्रामस्थानी सांगितले.

 

हे भटके कुत्रे जाणीवपूर्वक अज्ञातांनी आणून सोडल्याचे बोलले जात आहे.हे कुत्रे दिवसभर मोठ्या मोठ्याने भुकत,एकमेकावर आक्रमक होताना दिसत आहेत.अख्या गावभर हंगामा करत असल्याने गावात सध्या भीतीचे वातावरण आहे.लहान मुलांना घराबाहेर फिरणे जिकिरीचे झाले आहे.शाळा सुरु व्हयला अवघे १० दिवस बाकी आहेत.या कालावधीत यावर ठाम उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे. या गोष्टीकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थानी केला आहे.शासनाने याकडे तात्काळ लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.