तळवडे येथे नारायण राणे यांच्या विजयाच्या पार्श्वभूमीवर ‘बाईक रॅली ‘

भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संजू परब यांची उपस्थिती

सावंतवाडी । प्रतिनिधी :
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विजय उत्सवाच्या पार्श्वभूमीवर तळवडे येथे महायुतीच्या माध्यमातून विजय मिरवणूक काढण्यात आली. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संजू परब तसेच माजी सभापती पंकज पेडणेकर यांच्या नेतृत्वात ही रॅली काढण्यात आली.

यावेळी त्यांनी सर्व मतदारांचे आभार मानले. दरम्यान यापुढे गावातील विकास कामांसाठी आवश्यक सहकार्य केले जाईल.असे शब्दही महायुतीच्या पदाधिकाऱ्यांकडून ग्रामस्थांना देण्यात आला.यावेळी माजी सभापती पंकज पेडणेकर दादा परब आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.