परुळे (प्रतिनिधी) : जागतीक पर्यावरण दिना निमित्ताने निवती-मेढा सागरकिनारी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. कांदळवन कक्ष, कांदळवन प्रतिपठान सिंधुदुर्ग, युनायटेड नेशन डेव्हलपमेंट
प्रोगाम यांचा संयुक्त प्रकल्प अंतर्गत जी. सी. एफ प्रकल्पांतर्गत निवती मेढा सागरकिनारी स्वच्छता
मोहीम राबविण्यात आली.
या स्वच्छता मोहीमे मद्ये सरपंच अवधुत रेगे, सर्व ग्रा.पं.सदस्य, ग्रामसेवक शरद शिंदे, कांदळवन समिती निवती मेढा दिगंबर
नागोळकर, कांदळवन कक्षाचे उपजीविका तज्ञ केदार पालव, दिगंबर तोरसकर,जागृती गवंडे
दिपक जाधव, मोहीनी भिंगारे, शुभम कांबळे, निरज कोरगावकर, प्रकल्प समन्वयक कांदळवन प्रतिष्ठान आदीसह बचतगट सी आर पी
उमेद अंतर्गत महीला बचत गटाच्या महीला, ग्रा पं कर्मचारी उपस्थित होते. यावेळी
प्लॅस्टिक बॉटल, काचेच्या बॉटल इ .कचरा वर्गीकरण करून एकत्र करण्यात आला.











