खेड तालुका बौद्ध कर्मचारी संघटनेच्या वतीने मनुस्मृती विरोधात निवेदन

खेड(प्रतिनिधी) मनुस्मृतीमधील आक्षेपार्ह श्लोक शालेय अभ्यासक्रमात अंतर्भूत न करण्याबाबत निवेदन खेड तालुका बौद्ध कर्मचारी संघटनेच्या वतीने देण्यात आले.

 

भारतीय राज्यघटनेने दिलेल्या मूलभूत हक्कांस बाधा आणणाऱ्या मनुस्मृती या विषारी ग्रंथातील श्लोक शालेय अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करणे म्हणजे पवित्र आणि विषमता विरहित राज्यघटनेतील अनुच्छेदांची पायमल्ली करणे होय. या विषमतावादी अन्यायकारक श्लोकांमुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडून आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा कलंकित होणार आहे. हे टाळण्यासाठी, तहसिल व जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन आपल्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीच्या श्लोकांचा अंतर्भाव न करता मनुस्मृतीस स्थान देण्यात येऊ नये अशी शासनास विनंती करण्यात आली आहे.

 

यावेळी संघटनेचे अध्यक्ष मंदार हळदे, संस्थापक भागुराम तांबे, माजी अध्यक्ष चंद्रकांत कांबळे, जयंत तांबे व दिपक कांबळे उपस्थित होते.