शासनाने फिरवली दिव्यांगांन कडे पाठ दिव्यांग बघत आहेत पेन्शन ची वाट

खेड(प्रतिनिधी)लोकसभा निवडणुकीच्या धावपळीत शासनाने चक्क दिव्यांग व्यक्ती यांच्याकडे पाठ फिरवली आहे. खुप जाचक अटीचीं पूर्तता करून अनाथ,गरीब,गरजू दिव्यांग व्यक्तींना तुटपुंज्या स्वरूपात मिळणारी संजय गांधी दिव्यांग पेन्शन योजना या योजेनेचे मानधन गेली दोन महिने दिव्यांग व्यक्तीच्या खात्यात जमा झालेले नाही. ज्या गरीब गरजू, अनाथ दिव्यांगाचा उदरनिर्वाह याच पेन्शन वर होत आहे ते पेन्शनची आतुरतेने वाट पहात आहे.

 

 

 

 

 

 

 

काही महिन्यान पूर्वी महाराष्ट्रात शासनाच्या वतीने शासन दिव्यांगांच्या दारी हा उपक्रम राबवीला पण रत्नागिरी जिल्ह्यातील किती गरजू दिव्यांगाना या योजनेचा फायदा झाला असा प्रश्न आता दिव्यांगा मधून उपस्थित होत आहे आमदार खासदार यांच्या पेन्शन मध्ये नेहमीच भरघोस वाढ होत आहे पण दिव्यांगाना महिना दीड हजार मिळणारी पेन्शन वेळेत मिळत नाही. असा सूर आळवला जात आहे

 

 

 

 

इतर राज्यां प्रमाणे महाराष्ष्ट्रा तील दिव्यांग व्यक्तींना मिळणाऱ्या पेन्शन मध्ये वाढ करून दयावी व ती वेळेत मिळावी या करता दिव्यांग व्यक्तींन करता कार्य करणाऱ्या विविध संघटना शासनदरबारी दिव्यांगाच्या विविध अडचणी संदर्भात पत्रव्यवहार करून निवेदन देउनही दिव्यांगांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत आहे. रत्नागिरी जिह्यातील दिव्यांग व्यक्तींसाठी कार्य करणाऱ्या दिव्यांग युवा क्रीडा प्रतिष्ठान रत्नागिरी (क्रीडा,सामाजिक,शैक्षणिक, संस्कृतिक )या संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत सावंत यांनी

 

जिल्ह्याचे खासदार,पालक मंत्री आमदार व जिल्हाधिकारी यांनी देखील विविध दिव्यांग संघटनेच्या मांगण्या संदर्भात शासन दरबारी पाठपुरावा करून दिव्यांग व्यक्तींच्या विविध अडचणी सोडविण्यासाठी व सर्वागीन विकासासाठी सहकार्य करावे.असे मत प्रसिद्धी मांध्यमाशी बोलतांना व्यक्त केले आहे.