खेड (प्रतिनिधी) सहजीवन शिक्षण संस्था संचलित आय.सी.एस. महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. अनिता आवटी यांची प्राचार्यपदी निवड करण्यात आली आहे.
मुंबई विद्यापीठ व शासनाच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत मुलाखत घेवून रितसर प्राचार्यपदी निवड करण्यात आली. या निवडीबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष मंगेश बुटाला यांच्याहस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी उपाध्यक्ष नंदकुमार गुजराथी, खजिनदार विलास बुटाला, महाविद्यालयाच्या गव्हर्निंग कौन्सिलचे चेअरमन अॅड. आनंद भोसले यांच्यासह संस्था पदाधिकारी उपस्थित होते. प्राचार्य डॉ. जी. बी. सारंग यांच्या सेवानिवृत्तीनंतर रिक्त जागी त्यांची प्रभारी प्राचार्य म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरीची दखल घेत त्यांना कायमस्वरूपी प्राचार्यपदी बढती देण्यात आली आहे.










