टाकेडे ग्रामविकास मंडळ मुंबई व ग्रामीण यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रमांचे आयोजन

मंडणगड | प्रतिनिधी : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधुन टाकेडे ग्रामविकास मंडळ मुंबई (रजि.) आणि टाकेडे ग्रामविकास मंडळ ग्रामीण यांच्या संयुक्त विद्यमाने 9 जुन 2024 रोजी टाकेडे येथे वृक्षारोपणकार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या निमीत्ताने गावातील विठ्ठल रुखमाई मंदिरात आयोजीत स्वागत व सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्षपद चंद्रकांत शिंदे यांनी भुषविले. कार्यक्रमास उपस्थित पाहुण्यांचे स्वागत अनंतराव शिंदे व ग्रामस्थांनी केले.

 

कार्यक्रमास माजी सभापती अमिता शिंदे, अस्मिता केंद्रे, अनंत केंद्रे, दयानंद येसरे, वनपाल अनिल दळवी, ग्रामसेवक श्री. पालवे, पोलीस पाटील दिनेश जाधव, कृषीसहाय्यक श्री. नागरगोजे, अंगणवाडी सेविका अमिता गणवे, मुंबई मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत शिंदे, सचिव राकेश चाळके, खजिनदार सतिश पाटेकर, माजी अध्यक्ष सुरेश पाटेकर, शांताराम साळुंखे, सदस्य दिनेश चाळके, वैभव पाटेकर, नितीन पाटेकर, अनंत शेलार, सुर्यकांत पवार, महेश आंब्रे, मंगेश चाळके, सुदेश पवार, जयवंत शिंदे, कृष्णकांत शिंदे, अमेय शिंदे, अनुज कदम, प्रशांत कदम, बबन चाळके, सार्थक पवार, दिनेश आंब्रे, सुनिल शेलार, अजित कदम, हर्षद जाधव या मुंबई मंडळातील मान्यवरांसह ग्रामविकास मंडळ ग्रामीणचे अध्यक्ष सिताराम सुर्वे, सचिव सुनिल पाटेकर , खजिनदार अनिल गणवे, उत्कर्ष महिला मंडळ अध्यक्षा सौ प्रियांका साळुंखे, सचिव सौ संजिवनी चाळके, खजिनदार माधुरी गणवे, श्री महालक्ष्मी टाकेडे महिला मंडळ मुंबई च्या सल्लागार सौ रेश्मा शेलार सौ रोहिणी शिंदे सभासद सदस्या सौ निधी पाटेकर संध्या पाटेकर उपस्थित होत्या.

 

यावेळी बोलताना श्री.अनंत शिंदे यांनी वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभुमीवर टाकेडे ग्रामस्थ खारीचा वाटा उचलून गावाच्या हद्दीत पर्यावरण रक्षणासाठी पुढाकार घेत असल्याचे सांगीतले. यावेळी वनपाल श्री. दळवी, ग्रामसेवक श्री. पालवे कृषी विभागाचे श्री. नागरगोजे माजी सभापती अमिता शिंदे, अस्मिता केंद्रे यांनी कृषी वनविभाग व जिल्हापरिषदेच्या विविध योजनांची माहीती देत वृक्षलागवडी कशी करावी माती परिक्षणाची आवश्यकता या विषयावर ग्रामस्थांना माहीती दिली. वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे या तुकोबांच्या अभांगाला साजेसे सुत्य उपक्रम राबवत ग्रामस्थांनी यावर्षीही पर्यावरणाचे रक्षणासाठी उपक्रम राबवून पर्यावरण दिन साजरा करत तालुक्यापुढे आदर्श निर्माण केला विविध प्रकारची झाडांची लागवड करून त्याचे संवर्धन होईल याची काळजी ग्रामस्थांकडून घेतली जाते, मानवी जीवनात वृक्षांचे स्थान विशद करण्यासाठी दरवर्षी कार्यक्रम हाती घेऊन पर्यावरण तज्ञ, कृषी विभाग, वनविभागांच्या अधिकाऱ्यांना आमंत्रित करून त्यांच्यामार्फत उपस्थित नागरिकांना पर्यावरणाचे महत्व पटवून दिले जाते. याच कार्यक्रमात बोलताना ग्रामसेवक श्री पालवे साहेब यांनी पुढील वर्षांपासून कार्यक्रमाला लागणारी झाडे ग्रामपंचायती मार्फत पुरवण्याचे अभिवचन दिले.

 

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गणेश सुर्वे यांनी केले. यावेळी उपस्थित मान्यवरांचे हस्ते गावाचे हद्दीत वृक्षारोपण करण्यात आले याचबरोबर ग्रामस्थांना फळझाडांचे वाटप करण्यात आले त्यानंतर अल्पोपहार देउन उपस्थिताचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
यंदा देवराई व स्मशानभूमीत होणार लागवड- टाकेडे गावात जिल्ह्यास मार्गदर्शक ठरणारी मोहीम गेल्या सोळा वर्षापासून पर्यावरण दिनाचे निमीत्ताने राबवली जाते यात ग्रामस्थांचा उल्लेखनीय सहभाग असतो दरवर्षी गावातील प्रत्येक ग्रामस्थांस घरपट झाडे पुरवली जात असते यंदा वनविभाग कृषी विभाग व ग्रामपंचायतीचे मदतीने गावातील देवराई व स्मशानभूमीत स्थानीक प्रजातीचे झाडांची रोपे लावण्याचा संकल्प करण्यात आला त्यासाठी सर्व यंत्रणांनी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी दिले.