खेड (प्रतिनिधी) मुंबई गोवा महामार्गावर भरणे नाका या ठिकाणी नवभारत हायस्कूल ठाणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी फुट ओवर ब्रिज बांधण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते रुपेश पवार यांनी महामार्ग बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता कडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे
मुंबई गोवा महामार्गाचे कशेडी ते परशुराम घाट दरम्यानच्या टप्प्यातील बहुतांशी काम पूर्ण झाले आहे असे सांगण्यात येते मात्र अजूनही भरणे नाका या ठिकाणी सर्विस रोडचे काम अर्धवट आहे त्याचप्रमाणे काही ठिकाणी अंडरपासचे काम देखील केवळ करायचं म्हणून केले असल्याचे पाहायला मिळते या सोबतच भरणे नाका येथील कुणबी शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवघर हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भरणे या रस्त्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूला असणाऱ्या महत्त्वाच्या शाळा असून त्या ठिकाणी शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत मात्र त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा फूट ओव्हर ब्रिज म्हणजेच पादचारी उड्डाणपूल नाही त्या ठिकाणी फुट ओव्हर ब्रिजची अत्यंत अत्यावशकता असून मुंबई गोवा महामार्गावरील वाढती रहदारी व वाढते अपघात यांचा विचार करता देशाचे भविष्य असलेल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करता त्या ठिकाणी फुट ओवर ब्रिज तात्काळ बांधण्यात यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते आणि भरणे येथील रहिवासी रुपेश पवार यांनी राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभाग यांच्या कडे एका निवेदनाद्वारे केली आहे









