भारतीय जनता पार्टी साठ पदाधिकाऱ्यांची विस्तृत तालुका कार्यकारिणी जाहीर.

मंडणगड l प्रतिनिधी  माजी आमदार विनय नातू, माजी आमदार सुर्यकांत दळवी, भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतिष मोरे, माजी अध्यक्ष केदार साठे, जिल्हा सरचिटणीस विश्वदास लोखंडे, माजी तालुका अध्यक्ष अप्पा मोरे, तालुका अध्यक्ष प्रविण कदम, अमोल बोभस्कर, वसंत ताम्हणकर, नागेश धाडवे, मिहीर महाजन, मकरंद म्हादलेकर, रविकुमार मिश्रा, गरिष जोशी, शैलेश तपकिरे, श्रीकृष्ण साठे यांच्यासह तालुक्यातील आजी माजी पदाधिकारी व सक्रीय कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत 22 जुलै 2025 रोजी धुत्रोली येथील शिवस्मारक भवन सभागृहात आयोजीत पार्टीचे मेळाव्यात मंडणगड तालुक्याची साठ पदाधिकाऱ्यांची विस्तृत कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

मेळाव्याचे प्रस्तावीक अप्पा मोरे व प्रविण कदम यांनी केले तर सुत्रसंचालन विश्वदास लोखंडे यांनी केले यानंतर मान्यवरांनी सर्व कार्यकर्त्यांना पार्टीच्या कामाविषयी आपले मते मांडण्याची सुचना केल्या यानंतर माजी आमदार विनय नातू, माजी आमदार सुर्यकांत दळवी यांनी कार्यकर्त्यांना पक्ष वाढ व कार्यकर्त्यांची सार्वजनीक जीवनातील भुमिका या संदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोपात जिल्हाध्यक्ष सतिष मोरे यांनी जुन्या नव्या कार्यकर्त्यांचा संगम साधत विकासात्मक व संघटनात्मक पातळीवर पार्टीचे काम पुढे न्यायचे असल्याचा सल्ला कार्यकर्त्यांना दिला. लोकांमध्ये मिसळून आपले प्रभावक्षेत्र निर्माण करुन शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजना तळगाळात नेऊन पार्टीचे काम अधिक गतीने पुढे नेण्याचा सल्ला यावेळी दिला. यानंतर नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्त पत्र देण्यात आली याचबरोबर पार्टीचे वेगवेगळ्या आघाड्यांचे साठ पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. यात तालुक्याचे उपाध्यक्षपदी राजेश नगरकर, महेश दळवी, दत्ताराम महाडीक, विनोद दळवी, तन्वी महाजन, यांची नियुक्ती करण्यात आली. सरचिटणीस पदी तुषार येरुणकर, यश मेहता, चिटणीस पदी मंगला पवार, एकनाथ चव्हाण, महेश कंचावडे वैभव नारकर, प्राची कदम, सुषमा घोगरेकर यांची, कोषाध्यक्ष पदी राजेश दळवी, महिला मोर्चा तालुका अध्यक्षपदी श्वेता महाडीक, युवा मोर्चाचे अध्यक्ष पदी मकरंद रेगे, ओबीसी सेलचे अध्यक्षपदी कल्पेश गांधी या प्रमुख सेलसह साठ वेगेवगळ्या आघाड्यांचे प्रतिनिधींची निवड झाल्याचे घोषीत करण्यात आले. या कार्यक्रमाचे निमीत्ताने पार्टीचे महाराष्ट्र राज्य प्रदेश कार्यकारिणीचे सदस्यपदी निवड झालेले माजी आमदार सुर्यकांत दळवी व जिल्हा सरचिटणीस विश्वदास लोखंडे यांचा तालुका शाखेच्यावतीने विशेष सत्कारही करण्यात आला.