शृंगारतळी येथे दुचाकी घसरून अपघात

 

गुहागर l प्रतिनिधी :पावसाला थोडी सुरुवात झाली असून रस्ता अजून पुरेसा धुपलेला नाही. आज गुहागर विजापूर हायवे वरील गुहागर तालुक्यातील शृंगार तळी जवळिल हॉटेल झायका समोर दुचाकी घसरून दोन तरुण गंभीरित्या जखमी झाले आहेत. एकाची परिस्थिती गंभीर असून त्याला पुढील उपचारासाठी रत्नागिरी येथे सिविल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे.

 

 

हे तरुण गुहागर वरून चिपळूण तालुक्यातील ओमळि येथील आहेत अभिषेक बांद्रे व प्रसाद बांद्रे अशी जखमी तरुणांची नावे असून अपघात झाल्यानंतर तात्काळ त्यांना शृंगारतळि येतील ओक ह्यांच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. एकाच्या डोक्याला जबरदस्त मार लागल्यामुळे त्याला रत्नागिरी सिव्हल येते पाठवण्यात आल्याची माहिती डॉक्टरांकडून मिळाली आहे. अपघाताची माहिती मिळताच तरुणांचे नातेवाईक ही शृंगारतळी मध्ये दाखल झाले. अपघाताची माहिती मिळताच गुहागर पोलिस देखील घटनास्थळी दाखल झाले.