१६ जून रोजी सावरकर नाट्यगृहात होणार सादरीकरण
रत्नागिरी :- रत्नागिरीतील रसिक कलाकारांसाठी आर्च एंटरप्रायजेस आणि समर्थ इन्व्हेस्टमेंटने नवी पर्वणी आणली असून २०२३-२४ या वर्षातील १२ कार्यक्रमांच्या मालिकेतील तिसरे व अखेरचे पर्व रत्नागिरीत होत असून त्यानिमित्ताने ‘शिवकल्याण राजा’ प्रथमच नृत्यस्वरुपात रत्नागिरीकरांना पहायला मिळणार आहे.
आर्च एंटरप्रायझेसने संकल्पित केलेल्या २०२३-२४ या वर्षामधील १२ कार्यक्रमांच्या मालिकेतील तिसरे व अखेरचे पर्व ह्या वर्षी १६ जून ते २० जून या दरम्यान संपन्न होणार आहे.
या पर्वामध्ये सर्वात पहिला कार्यक्रम रविवार १६ जून २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता, रत्नागिरीच्या स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहामध्ये संपन्न होणार आहे.












