वेंगुर्ले | प्रतिनिधी : भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष व युवा नेते विशाल परब यांच्या माध्यमातून वेंगुर्ले तालुक्यातील ४५ वारकरी संप्रदायातील मंडळींना मोफत देवदर्शन सहलीचा शुभारंभ उद्या शनिवार दिनांक १५ जुन रोजी सायंकाळी ५ – ३० वाजता चांदेरकर महाराज विठ्ठल मंदिर येथे होणार आहे.
मोहीनी एकादशी निमीत्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात विशाल परब यांनी नारायणराव राणे हे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातुन विजयी झाल्यावर वारकरी मंडळींना मोफत देवदर्शन सहल घडवून आणेन, असे अभिवचन दिले होते. त्याचीच पुर्तता म्हणुन तुळजापूर – अक्कलकोट – पंढरपूर – नृहसिंहवाडी – महालक्ष्मी कोल्हापूर अशी तीन दिवसांची सहल आयोजित करण्यात आली आहे.त्यामुळे वारकरी संप्रदायातील मंडळींमध्ये उस्ताहाचे वातावरण निर्माण झाले आहे .










