ओटवणे येथिल रणझुंझार ग्रुपच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद.

Enthusiastic response to Ottawane Yethil Ranzhunzar Group’s Blood Donation Camp.

ओटवणे | प्रतिनीधी :  ओटवणे रणझुंझार या नव्याने स्थापन करण्यात आलेल्या ग्रुपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून पहिली वहिली 38+ही स्पर्धा यशस्वी केल्यानंतर या ग्रुपने रक्तदानासारख शिबिर घेत ते यशस्वी केले. या शिबिराचे उद्घाटन सावंत वाडीतील डॉ. योगेश किरवले यांनी केले यावेली गावचे सरपंच आत्माराम ऊर्फ दाजी गावकर, उपसरपंच संतोष कासकर माजी सरपंच रवींद्र म्हापसेकर, ओटवणे शाळा नंबर १ कमिटी अध्यक्ष मंगेश गावकर सह प्रभाकर गावकर उपास्थित होते. या शिबिराला ५०हून अधिक रक्तदात्यानी हजेरी लावली मात्र आरोग्याच्या अनेक समस्यांमुळे अनेकांना इच्छा असूनही रक्तदान करता आले नाही.या शिबिरात २२जणांनी प्रत्यक्ष रक्तदान केले.

यात विजय गवंडे, प्रशांत बुरान, रामचंद्र भालेकर,शंभा भैरवकर, जयगनेश गावकर, विजय म्हापसेकर, दिनेश गवंडे, विश्वनाथ बोरये, मधूकर गावकर, किरण गावकर, संकेत मयेकर, स्वप्नील म्हापसेकर, आर्यन मयेकर, आकाश मेस्त्री, सत्यवान गावकर, अक्षय तळवडेकर, अजित आंगचेकर, महादेव केळुसकर, प्रविण शिंदे, वासुदेव गावकर, पंकज गावकर, संदेश रावुळ यांनी रक्तदान करत सहभाग नोंदवला.या यावेळी तब्बल २० वेळा रक्तदान करणाऱ्या जयगनेश गावकर तसेच ८वेळारक्तदान करणाऱ्या अमेय गावडे याला सन्मानित करण्यात आले. रणझुंजार या ग्रुपचा महत्वाचा उद्देश म्हणजे गावातील लोकांच्यासाठी रुग्णवाहिका घेण्याचा आणि त्याची सुरुवात क्रीडा स्पर्धेतून करण्यात आली. आणि या रक्तदान शिबिरा दरम्यान डोनेशन पेटीत रक्कम जमा करत पुन्हा एकदा शुभारंभ करण्यात आला. जिल्ह्यात आदर्शवत ठरलेल्या ३८+मधून जमा झालेली रक्कम आणि अनेक दात्यांकडून मिळणारी रक्कम यातून गावासाठी रुग्णवाहिका काही दिवसातच आणण्याचा संकल्पच रणझुंझार ग्रुपने केला असून त्यांच्या उपक्रमाच गावातील सर्वच स्थरातून कौतुक होत आहे. या रक्तदान शिबिरासाठी सहकार्य करत शिबिर यशस्वी करणाऱ्या सर्वांचेच रण झुंझार च्या वतीने आभार मानण्यात आलेत. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी रण झुंजार चे सर्वे सर्वा अजित आंगचेकर, पोलिस पाटील लक्ष्मण गावकर, किरण गावकर, अनंत तावडे, जयगनेश गावकर, संतोष तावडे, रवींद्र म्हापसेकर, ज्ञानेश्वर गावकर, ज्ञानेश्वर मयेकर, जयसिंग गावकर , पत्रकार दिपक गावकर, संदीप सोनार, आनंद भैरवकर, बाळू म्हैसकर, आनंद गावकर, बाळा गावकर, रोहिदास कासकर, संतोष कासकर,आदींनी विशेष परिश्रम घेतले.