ओटवणेच्या सुपुत्राची मुंबई क्रिकेट असो. गुणलेखक पदी नियुक्ती

Google search engine
Google search engine

Ottawane’s son’s Mumbai cricket. Appointment to the post of Quality Assurance Officer

ओटवणे | प्रतिनीधी : ओटवणे गावचे सुपुत्र आणि मुम्बई स्थित टिळक चौक कल्याणचे रहिवाशी विवेक अनिल गावकर या युवकाची मुम्बई क्रिकेट असोसिएशनच्या गुणलेखक पदी अधिकृतरीत्या निवड करण्यात आली. विवेक गावकर याच्या सह कल्याण शहरातील शार्दुल सुनील बोंद्रे याचीही निवड करण्यात आली. कल्याण शहर म्हणजे म्हणजे क्रीडा, राजकीय,सांस्कृतिक वारसा लाभलेले शहर. या शहराने अनेक खेळाडू कलाकार घडवलेत.मात्र गुण लेखक पदी झालेली निवड ही मुंबई क्रिकेट असोसिएशन ने या युवकांचा केलेला गौरव असून मिळालेल्या माहितीनुसार कल्याण शहरातील हे दोघे प्रथमच यापदी निवड झालेले गुणलेखक आहेत.

कल्याण शहरातून अनेक खेळाडूंनी कल्याण शहराचे प्रतिनिधित्व करताना रणजी ट्रॉफी असेल आयपीएल असेल अनेक स्पर्धांतून आपली छाप सोडली. मात्र गुणलेखक सारखी परीक्षा पास होणारे हे दोन कल्याण शहरातील उच्चशिक्षित युवक असून त्यांच्या या कामगिरी बद्दल त्यांचे कल्याण शहरातून अभिनंदन होत आहे. विवेक याच्या निवडीने ओटवणे गावातूनही त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.