विशाल परब यांच्या माध्यमातून सावंतवाडी शहरात बहिर्वक्र आरसे

Google search engine
Google search engine

Convex mirrors in Sawantwadi city by Vishal Parab

माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते लोकार्पण

केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य

सावंतवाडी । प्रतिनिधी :

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त युवा नेते विशाल परब यांच्यावतीने विशाल फाऊंडेशनच्या माध्यमातून सावंतवाडी शहरात लावण्यात आलेल्या अपघातरोधक आरश्यांचा सोमवारी माजी नगराध्यक्ष संजू परब व भाजपाचे जिल्हा सरचिटणीस मनोज नाईक यांच्याहस्ते लोकार्पण करण्यात आले. सावंतवाडी शहरात तब्बल वीस ठिकाणी हे आरसे बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे शहरात होणारे विशेषतः लहान मुलांचे अपघात कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास युवा नेते विशाल परब यांनी व्यक्त केला.

तर अशा प्रकारचे अपघातरोधक बहिर्वक्र आरसे शहरात बसविण्यात आल्यामुळे त्याचा फायदा नागरिकांना व वाहनचालकांना होणार आहे. त्यामुळे विशाल परब यांनी राबविलेला उपक्रम कौतुकास्पद आहेत. यापुढेही शहरात अपघात होत असलेल्या ठिकाणी आरसे लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे, असे संजू परब यांनी सांगितले.

यावेळी युवा नेते विशाल परब, माजी नगराध्यक्ष संजू परब, जितेंद्र गावकर, दिलीप भालेकर, माजी नगरसेविका दिपाली भालेकर, विनोद सावंत, ओंकार पावसकर, तेजस माने, अनिल सावंत, विनोद सावंत आदी उपस्थित होते.

Sindhudurg