जी. जी. पी.एस. चा एस.एस.सी.चा निकाल ९९.४०%

 

रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमान गंगाधर गोविंद पटवर्धन इंग्लिश मीडियम स्कूल, रत्नागिरी (जी.जी.पी.एस.) च्या वतीने एस.एस.सी. विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला.

त्यावेळी प्रशालेतून उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.शाळेचा एकूण निकाल ९९.४०% इतका लागला.प्रशालेतून एकूण १६८ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झालेले असून १६७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. प्रशालेतून प्रथम क्रमांक- कुमार रूपक ओंकार प्रसाद सातोस्कर( ९७%), द्वितीय क्रमांक- कुमारी साईश्री संतोष मळेकर( ९६.८०%), तृतीय क्रमांक -कुमारी जान्हवी मनोज सावंत( ९६.६०% ) मिळवून या विद्यार्थ्यानी घवघवीत यश संपादन केले. प्रशालेतून विशेष प्राविण्य मिळविलेले विद्यार्थी ९२ असून प्रथम श्रेणीत ५६ , द्वितीय श्रेणीत १४ आणि तृतीय श्रेणीत पाच विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

एस.एस.सी.विद्यार्थी सत्कार समारंभासाठी शालेय समिती अध्यक्ष श्री. मंदार गाडगीळ उपस्थित होते. तसेच माध्यमिक प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. सोनाली पाटणकर, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका स