अमेरिकन तरुणीला गुपचूप गावी आणलं, 1 महिना घरात ठेवलं; नंतर घडलं असं, पोलीसही शॉक

खनौ : उत्तर प्रदेशच्या इटावा येथील एक तरुण चंदिगडमध्ये राहत होता. PUBG खेळताना एका अमेरिकन तरुणीची भारतीय तरुणाशी मैत्री झाली. मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. अमेरिकन तरुणी आपला देश सोडून भारतात आली.

तरुणाने तिला गुपचूप आपल्या गावी नेलं आणि महिनाभर घरात लपवून ठेवलं. त्यानंतर असं काही घडलं की पोलिसांची झोप उडाली.

अमेरिकेतील फ्लोरिडा इथं राहणाऱ्या ब्रुकलिन कार्नेलीचे दिल्लीत राहणाऱ्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. PUBG खेळताना इटावा येथील एमरौरी येथे राहणारा हिमांशू यादव याच्याशी तिची मैत्री झाली. हा तरुण दिल्लीत कामाला होता. दोघांनी एकत्र जगण्याची आणि मरण्याची शपथ घेतली. तरुणीला प्रियकराची आठवण आल्याने ती सर्व काही सोडून 5 मे रोजी चंदीगडला आली. तिथं आपल्या एका फ्रेंड कडे राहिली नंतर दिल्लीत एका कारखान्यात काम करणारा तिचा प्रियकर हिमांशूला भेटायला गेली.

तरुणाने तिला गुपचूप गावात आणलं

हिमांशू त्या तरुणीला त्याच्या गावी इटावाला घेऊन आला. दोघंही जवळपास महिनाभर गावात एकत्र राहिले. इटावाहून रोडवेजच्या बसने ती दिल्लीला परतत असताना हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं. त्यानंतर एका प्रवाशाला संशय आल्याने त्याने रोडवेजच्या एआरएमला फोन केला. एआरएम रोडवेजने शिकोहाबाद पोलीस ठाण्यात तपासाची माहिती दिली. रोडवेजची बस पोलीस स्टेशनला गेली. यानंतर प्रवाशाने संपूर्ण माहिती शिकोहाबाद पोलीस ठाण्यात दिली.

तरुण-तरुणीची चौकशी

पोलीस स्टेशनला पोहोचलेल्या रोडवेज बसमध्ये बसलेल्या तरुणाशी आणि परदेशी तरुणीशी बोलले. LIO टीमनेही घटनास्थळी मुलीशी बोलून तिचा पासपोर्ट पाहिला. सर्व कागदपत्रे पाहिल्यानंतर पोलिसांनी बसमध्ये बसवून सुखरूप दिल्लीला पाठवलं. मात्र ब्रुकलिन कार्नलीने पोलिसांना सांगितलं की, ती चार महिन्यांपूर्वी व्हिसावर भारतात आली होती आणि पंजाब ते इटावा येथे फिरत होती.

तरुणाने काहीच माहिती दिली नाही

पोलिसांनी या तरुणाची चौकशी केली असता त्याने नावाशिवाय कोणतीही माहिती दिली नाही. या तरुणाने आपलं आधार कार्ड आणि कोणत्याही प्रकारचे ओळखपत्र हरवल्याची सांगितलं. मात्र, तो परदेशी तरुणीशी कधीपासून संपर्कात होता, याचा शोध घेण्यासाठी पोलीस त्याची चौकशी करत आहेत.

हे संपूर्ण प्रकरण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरलं होतं. शहरातील पोलीस ठाण्याभोवती मोठी गर्दी झाली होती. परदेशी तरुणीचं काय प्रकरण आहे हे लोकांना जाणून घ्यायचं होतं.