सावंतवाडी । प्रतिनिधी : अभिनव फाऊंडेशन सिंधुदुर्ग तर्फे नरेंद्र डोंगर वनउद्यान येथे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी वड,पिंपळ,आवळा,बेल,सीताफळ, कडुलिंब,साग,पेरु,बहावा,चिकू आदी वृक्षांची रोपे लावण्यात आली.
या कार्यक्रमासाठी सावंतवाडी वनविभागाचे वनपाल श्री. दत्तात्रय पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या वृक्षारोपण सोहळ्यावेळी अभिनवचे पदाधिकारी श्री.राजू केळूसकर, श्री.तुषार विचारे, श्री.अण्णा म्हापसेकर, श्री.किशोर चिटणीस, श्री.जितेंद्र मोरजकर, श्री.अमित अरवारी, प्रा.केदार म्हसकर आदी उपस्थित होते.












