Itwari Tatanagar Express : इतवारी-टाटानगर एक्स्प्रेस सहा दिवस रद्द; 6 रेल्वेगाड्यांच्या मार्गात बदल

Nagpur News : दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या बिलासपूर विभागातील कोतरलिया रेल्वे स्टेशनला नॅशनल थर्मल पॉवर कॉपोर्रेशन तलाईपल्ली माईन्स लाइनशी जोडण्याचे काम करण्यात येणार आहे. यासाठी मार्ग ब्लॉक करण्यात येणार असून नेताजी सुभाषचंद्र बोस (इतवारी)-टाटानगर-नेताजी सुभाषचंद्र बोस (इतवारी) एक्स्प्रेस सहा दिवस रद्द करण्यात आली आहे.

 

यासह नागपूरमार्गे धावणाऱ्या सहा गाड्यासह एकूण १० रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. नेताजी सुभाषचंद्र बोस (इतवारी)-टाटानगर एक्स्प्रेस आणि १८१०९ टाटानगर-नेताजी सुभाषचंद्र बोस (इतवारी) एक्स्प्रेस २५ ते ३० जूनदरम्यान धावणार नाही.

यासह नागपूरमार्गे धावणारी संतरागाछी-पुणे हमसफर एक्स्प्रेस २९ जूनला आणि पुणे-संतरागाछी हमसफर एक्स्प्रेस १ जुलैला रद्द करण्यात आली आहे. हावडा-पुणे आझाद हिंद एक्स्प्रेस २५ ते ३० जून आणि पुणे-हावडा आझाद हिंद एक्स्प्रेस २७ जून ते २ जुलै दरम्यान, एलटीटी-शालीमाल एक्स्प्रेस २४, २५, २८ व २९ जून आणि शालीमार-एलटीटी एक्स्प्रेस २६, २७, ३० जून व १ जुलैला रद्द करण्यात आली आहे.

संतरागाछी-जबलपूर एक्स्प्रेस २६ जूनला, जबलपूर-संतरागाछी एक्स्प्रेस २७ जूनला, सिकंदराबाद-दरभंगा एक्स्प्रेस २५ व २९ जूनला आणि दरभंगा-सिकंदराबा एक्स्प्रेस २८ जून व २ जुलैला धावणार नाही. यासह गोंदिया-झारसुगुडा-गोंदिया मेमू पॅसेंजर बिलासपूर ते झारसुगुडा दरम्यान धावणार नाही.

सहा रेल्वेगाड्यांच्या मार्गात बदल

रेल्वेने प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, २४ ते २९ जून दरम्यान हावडा-मुंबई गीतांजली एक्स्प्रेस आणि २६ जून ते १ जुलै दरम्यान मुंबई-हावडा गीतांजली एक्स्प्रेस, २६ व २७ जूनला पोरबंदर-शालीमार एक्स्प्रेस आणि २८ व २९ जूनला शालीमार-पोरबंदर एक्स्प्रेस, २४ व २८ जूनला हटिया-पुणे एक्स्प्रेस आणि २६ व ३० जूनला पुणे-हटिया एक्स्प्रेसच्या मार्गात बदल करण्यात आले आहे. सहाही रेल्वेगाड्या झारसुगुडा-टिटलागड-रायपूरमार्गे धावणार आहेत.