एसटी कर्मचाऱ्यांना वाटप केले मोफत रेनकोट
लांजा (प्रतिनिधी) स्वतःचा हिमतीवर व्यवसाय सांभाळतानाच सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोनातून काम करणाऱ्या लांजा येथील दत्त भेळच्या संचालिका वैदेही वळंजु यांनी स्वखर्चाने लांजा एसटीत आगारातील सफाई कर्मचाऱ्यांना नुकतेच रेनकोटचे वाटप केले.’
लांजा येथील दत्त भेळच्या माध्यमातून वैदेही वळंजू या उद्योग व्यवसायात कार्यरत आहेत. मात्र उद्योग व्यवसाय सांभाळताना सामाजिक बांधिलकी या दृष्टिकोनातून त्या काम करत असतात. मग विद्यार्थ्यांना गणवेश वाटप असो किंवा अन्य त्यांचा सामाजिक कार्यात नेहमीच सहभाग असतो. लांजा येथील बस स्थानकातील काँक्रीटी करण्याचे काम सुरू झाल्यानंतर एसटी कंट्रोल रूम कुठे न्यायचा असा प्रश्न निर्माण झाला होता. यावेळी वैदेही वळंजू यांनी आपल्या दत्तभेळ या दुकानाच्या बाजूलाच एसटी साठी कंट्रोल रूमची व्यवस्था मोफत उपलब्ध करून दिली होती.
सध्या पावसाळ्यात एसटी सफाई कर्मचाऱ्यांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन त्यांनी स्वखर्चाने १० कर्मचाऱ्यांना रेनकोटचे वाटप केले .हा रेनकोट वाटप कार्यक्रम नुकताच पार पडला. यावेळी लांजा डेपो व्यवस्थापक काव्या पेडणेकर यांच्यासह एसटी चालक वाहक आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होते.











