परशुराम एज्युकेशन सोसायटी संचालित प्रेमजीभाई आसर प्राथमिक शाळेत मोठ्या उत्साहात शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला.
इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना फुल,पेढा आणि भेटवस्तू देवून शाळेत प्रवेशीत करण्यात आले.शालेय परिसर सजावट आणि त्या जोडीला सनई चौघड्यांच्या मंगल सूरांच्या साथीने सर्व विद्यार्थ्यांनी शाळेत प्रवेश केला.
शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम.नाईक यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना सर्व शिक्षा अभियानांतर्गत ‘मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप’ करून ‘पुस्तक दिन’ साजरा करण्यात आला.
प्रेमजीभाई आसर प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीम.संगिता नाईक यांच्या नियोजनानुसार व मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका सौ.सिध्दी ठसाळे,सौ.प्राची गगनग्रास यांची उपस्थिती लाभली.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील इयत्ता पहिलीच्या वर्ग शिक्षिका सौ.अनुराधा वाचासिध्द ,सौ.ज्योती शिंदे,सौ.दिक्षा महाडीक, सौ.अश्विनी दाभोळकर ,शिक्षक श्री.रोहिदास देवरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
आनंद आणि उत्साह यांनी भारलेला हा दिवस सर्वांच्या मनात नवचेतना निर्माण करणारा ठरला.












