विघ्नहर्ता ग्रुप चिपळूण व पुरोगामी शिक्षक संघटनेचे लाभले सहकार्य
चिपळूण ( वार्ताहर) : तालुक्यातील श्री वाघेश्वरी ग्रामदेवता मंदिर बामणोली परिसरात विघ्नहर्ता ग्रुप, चिपळूण आणि पुरोगामी शिक्षक समिती चिपळूण यांच्या सौजन्याने वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला.
“झाडे लावा.. झाडे जगवा” या शासनाच्या उपक्रमाचे महत्त्व लक्षात घेऊन बामनोली येथील श्री वाघेश्वरी ग्रामदेवता मंदिर परिसरात ट्रस्ट पदाधिकारी सर्व सदस्य यांच्याशीं विचारविनिमय करून विघ्नहर्ता ग्रुप चिपळूण आणि पुरोगामी समिती चिपळूण यांच्या सर्व पदाधिकारी यांनी प्रत्यक्ष बामणोली मध्ये जावून ग्रामस्थांच्या सहकार्यातून वृक्षारोपण केले. यावेळी सुमारे ८० ते ९० वेगवेगळ्या प्रकारची देशी जातीची झाडे लावून वृक्षारोपण करण्यात आले.
या कार्यक्रमात सर्व ग्रामस्थ व महिला मंडळ या सर्वांनी सहभाग घेत वृक्ष लागवडी केली.
कार्यक्रमासाठी मुंबईतून उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष अशोक वनगे, सचिव रामचंद्र तांबे, संतोष गोरीवले, महादेव पवार, सुरेश चांदिवडे, हरेश विठले आदी मंडळी उपस्थित होती.
या वेळी सुरेश तांबे यांचे सहकार्य लाभले. त्यांचे सहकारी व शिक्षक संघटनेच्या पदाधिकारी यांचाही ट्रस्टच्या मार्फत सत्कार करण्यात आला.
. सदर कार्यक्रमाचे नियोजन ट्रस्टचे अध्यक्ष सिताराम तांबे, सचिव काशिनाथ तांबे, उपाध्यक्ष रवींद्र तांबे, उपसरपंच शांताराम चांदीवडे आणि अन्य विश्वस्त मंडळी यांनी उत्तम रित्या केले..












