खेडमध्ये मटका अड्डयावर धाड, तिघांवर गुन्हा

खेड (प्रतिनिधी) खेड शहरातील जसनाईक कॉम्प्लेक्स सफा मस्जिद येथे बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या मटका जुगार अड्ड्यावर येथील पोलिसांनी धाड टाकली. या धाडीत ४,३४० रुपयांसह जुगाराचे साहित्य पोलिसांनी जप्त केले व यातील तिघांना रंगेहाथ पकडले.

हिदायत अब्दुल्ला मुल्लाजी, आशिष अशोक आरडे, नदीम अली जुईकर असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. हे तिघेजण जुगार खेळवत असल्याची गोपनीय माहिती मिळताच पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या पथकाने धाड टाकली. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल निलेशकुमार माने यांनी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली.