खेड(प्रतिनिधी) सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे रघुवीर घाटात कोसळलेली दरड सार्वजनिक बांधकाम खात्याने तातडीने हटवून मार्ग वाहतुकीसाठी मोकळा केला. दरड कोसळल्याची माहिती मिळताच येथील पोलीस कर्मचारी तातेडीने रवाना झाले. ग्रामस्थांच्या मदतीने रस्त्यावर कोसळलेला माहितीचा भराव बाजूला करण्याची कामगिरी बजावली.
कोसळणाऱ्या दरडी रोखण्यासाठी ७ ठिकाणी संरक्षक भिंती उभारण्यात आल्या आहेत. यासाठी ७ कोटी रूपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. यामुळे रघुवीर घाटात दरडी कोसळण्याचा धोका टळून पर्यटकांचा प्रवास सुखकर होण्याच्या शक्यतेने सारेच सुखावले होते. मात्र, घाटातील खालील बाजूस दरडी कोसळण्याचा धोका कायमच असल्याचे सोमवारी उघड झाले. यामुळे घाटातून मार्गक्रमण करताना वाहनचालकांना रघुवीर घाटातील धोकादायक ठिकाणी सावधानता बाळगावी लागणार आहे.











