चिपळूण (वार्ताहर) : श्री स्वामी समर्थ फाउंडेशन व हॉस्पिटल शिरगाव चिपळूण यांच्या एक हात मदतीचा या उपक्रमांतर्गत सावर्डे येथील सुप्रसिद्ध अमेय क्लासेसच्या गरजू व हुशार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले व नवीन शैक्षणिक वर्षासाठी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देवून मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी श्री स्वामी समर्थ फाउंडेशन शिरगावचे सहकारी डॉ.दर्शन खोत, कु. शंतनु पेटकर, अमेय क्लासेसच्या संचालिका सौ वृषाली नांदिवडेकर, मार्गदर्शक रामचंद्र नांदिवडेकर , सावर्डे परिसरातील विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
अमेय क्लासेस कडून सावर्डे परिसरातील विद्यार्थ्यांसाठी विविध अभिनव असे शैक्षणिक, सांस्कृतिक उपक्रम राबवले जातात. या विविध उपक्रमास श्री स्वामी समर्थ फाउंडेशन चे मुख्य प्रवर्तक डॉ. श्यामसुंदर भाकरे, डॉ. ज्योती भाकरे, समन्वयक श्री शंकरराव यादव सर, उपाध्यक्ष सौ.स्वाती पेटकर, सचिव डॉ सुमित पवार, सदस्य डॉ. रामेश्वर गौड , डॉ अविनाश पाटील, श्री सचिन मोरे,डॉ अमित बिडकर यांनी शुभेच्छा दिल्या.











