चिपळूण ( वार्ताहर) : प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वांमध्ये अनेक सुप्त गुण दडलेले असतात. मात्र अशा सुप्त गुणांना योग्य वेळी संधी मिळाली तर त्या गुणांचे सोने होते. यासाठी त्या व्यक्तीला नवी उमेद देत तिच्या पाठी मागे ठाम उभे राहण्याची गरज असते. अशीच एक चिपळूण आबिटगाव मधील गुणी कलावंत अनन्या खेराडे हीची कलेच्या माध्यमातून स्टार प्रवाह वाहिनीवरील लिटिल चॅम्पस् या कार्यक्रमासाठी झाली आहे.
तालुक्यातील आबिटगाव येथील एका सामान्य कुटुंबात अनन्या खराडे सारखे रत्न जन्मले आहे. शेतकरी कुटुंबातील कु.अनन्या विजय खेराडे हिचे आबिटगाव येथील जिल्हा परिषदेच्या ४ थी इयत्तेत शिक्षण घेणारी अनन्या कलेच्या क्षेत्रात हुशार आहे. लहानपणीच गायन, नृत्य कलेची प्रचंड आवड असणारी अनन्या सावर्डे येथील शारदा संगीत साहित्य,कला, क्रीडा अकादमीच्या संगीत विद्यालयात गुरुवर्य वरद केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेत आहे. नुकतीच तिची महाराष्ट्रातील प्रसिद्ध स्टार प्रवाह वरील कार्यक्रम आपल्या स्वरांनी अवघ्या महाराष्ट्राला मंत्रमुग्ध करणाऱ्या स्टार प्रवाह ह्या टेलिव्हिजन चॅनेल वरील प्रेक्षकांच्या आवडत्या “लिटिल चम्पस” कार्यक्रमात निवड झाली आहे. अंगीकृत कला सादर करण्याची अनमोल संधी तिला प्राप्त झाली आहे.
अनन्या खेराडे हीचे चिपळूण तालुका नमन भारुड लोककला मंडळ, नमन लोककला संस्था रत्नागिरी जिल्हा, कुणबी युवा चिपळूण , आबिटगाव ग्रामस्थ तालुकापंचक्रोशीसह विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.











