
तहसील कार्यालय झालेल्या बैठकीत ठेकेदार कंपनी आणि हायवे अधिकाऱ्यांना धरले धारेवर
संतोष कोत्रे |लांजा : लांजा शहरात रखडलेल्या सर्विस रोड, गटार आणि पाईपलाईनच्या कामावरून आज लांजा तहसील कार्यालयात आयोजित बैठकीत लांजा वासियांनी ठेकेदार कंपनीचे अधिकारी आणि महामार्ग अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. ही कामे होत नसतील तर सर्वच काम बंद ठेवा असा आक्रमक पवित्रा घेतला. दरम्यान पुढील आठ दिवसात ही कामे मार्गी लावण्याची डेडलाईन महामार्ग अधिकारी व ठेकेदार कंपनीचे अधिकारी यांना देण्यात आली.
लांजा शहरात मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असून सध्या पावसाळ्यात सुरू असलेल्या कामांमुळे लांजावासीयांना चिखलातून पायपिट करावी लागत असून अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तहसील कार्यालय लांजा येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीत लांजा तहसीलदार प्रमोद कदम, महामार्ग विभागाचे उप अभियंता आर.पी. कुलकर्णी, कन्सलटिंग ऑफिसर
प्रशांत पाटील , ईगल इन्फ्राचे नरेश शितलानी, ईगल इन्फ्रा कंपनीचे नानेजा जयंतीलाल तसेच लांजा नगर पंचायत च्या मुख्याधिकारी हर्षला राणे, नगराध्यक्ष मनोहर बाईत आदी उपस्थित होते.
सुरुवातीलाच लांजा शहरातील रखडलेल्या पाईपलाईन, गटाराचे काम आणि सर्विस रोड यावरून उपस्थित नागरिकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यामध्ये राष्ट्रवादीचे अभिजीत राजेशिर्के तसेच बाबा लांजेकर, नगरसेवक मंगेश लांजेकर, नगरसेवक सचिन डोंगरकर, अनंत आयरे, व्यापारी कुमार बेंडखळे, संजय यादव , प्रकाश लांजेकर,
आदींनी हायवे प्रशासन अधिकारी व महामार्ग ठेकेदार कंपनीचे अधिकारी यांचेवर प्रश्नांची सरबत्ती केली. रखडलेल्या सर्विस रोडचा कामामुळे सध्या नागरिकांना चिखलातून मार्गक्रमण करावे लागत आहे. त्याचप्रमाणे महामार्ग ठेकेदार कंपनीने गटारांचे काम केले नसल्याने पावसाचे पाणी हे नागरिकांच्या घरे आणि दुकानात घुसून त्यांचे नुकसान होत आहे. त्याचप्रमाणे गटारांअभावी अन्य समस्या देखील उद्भवतात आहेत .त्याचप्रमाणे सध्या पाईपलाईनचे काम सुरू आहे, यामुळे अनेक नागरिक आणि व्यापारी वर्गांचे नळ कनेक्शन तुटले असून याबाबत वारंवार सांगून देखील त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.
या सर्वच मुद्द्यांवर उपस्थित नागरिकांनी हायवे अधिकारी आणि ठेकेदार कंपनीचा अधिकाऱ्यांना प्रश्नांची सरबत्ती करून जेरीज आणले महामार्ग ठेकेदार अधिकारी आणि महामार्ग अधिकारी यांच्या चुकीच्या धोरणांमुळे आणि कामांमुळे लांजावासीयांना त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत त्यांना फैलावर घेतले. गटारे ,सर्विस रोडचे काम तुम्हाला करता येत नसेल तर सर्वच काम बंद ठेवा, असा आक्रमक पवित्र नागरिकांनी घेतला. नगरसेवक सचिन डोंगरकर यांनी सांगितलेली गेल्या दीड वर्षापासून कुवे येथील नागरिकांचेभूसंपादनाचे पैसे देखील मिळाले नाहीत त्यामुळे अनेक लोक या पैशाची वाट बघत मरण पावले आहेत. त्यामुळे हा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी केली.
दरम्यान पुढील आठ दिवसात लांजा नगरपंचायत कार्यक्षेत्रातील कुवे ते लांजा कोर्ले फाटा इथपर्यंत महामार्गाच्या साईट सर्विस रोड, गटात व पाईपलांचे काम पूर्ण करून देण्याची मुदत महामार्ग अधिकारी आणि ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. तर पुढील आठ दिवसात काम पूर्ण न झाल्यास यापुढे गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल असा इशारा देखील नागरिकांच्या वतीने घेण्यात आला .
तर या संदर्भात हायवे अधिकारी व ठेकेदार कंपनीने कामांची पूर्तता काय केली? काम कुठपर्यंत झाले याचा आढावा घेण्यासाठी १ जुलै रोजी पुन्हा एकदा बैठक घेऊन त्याचा जाब विचारला जाणार आहे. या बैठकीला लांजातील सर्व स्तरातील नागरिक उपस्थित होते.












