कोकण चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे आज कोकण व्हिजन परिषद

खेड (प्रतिनिधी) : कोकण चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे २० जून रोजी सायंकाळी ७ ते रात्री १० यावेळेत दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक सभागृहात कोकण व्हिजन परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी कोकण आयडॉल व कोकण वायनरी क्लबचे प्रमुख संचालक माधव महाजन, ग्लोबल कोकण-समृद्ध कोकण संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय यादवराव मार्गदर्शन करणार आहेत.
या परिषदेत कोकणातील  उद्योग विकसित करताना शासन व प्रशासन स्तरावर येणाऱ्या अडचणी, ठोस कृती कार्यक्रम, कोकण विकासाचे प्रमुख विषय व व्यवसाय संधी यावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या परिषदेस बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.