खेड(प्रतिनिधी) खेड तालुका रोहिदास समाज सेवा संघाचे माजी सल्लागार व धामणी येथील रहिवासी काशिनाथ सखाराम सावरटकर (८४) यांचे सोमवारी वृद्धापकाळाने निधन झाले.
रोहिदास समाज सेवा संघाची तालुक्यात स्थापना करण्यात मोलाचे योगदान सावरटकर यांनी दिले होते संघात सदस्य, संघटक व सल्लागार म्हणून काम केले. संघाचे कार्य शहरासह ग्रामीण भागात पोहचवण्यासाठी योगदान देत समाजातील अनेक तंटे सलोख्यातून सामोपचाराने मिटवण्यात महत्वाची भूमिका निभावली.
मंगळवारी धामणी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी तालुकाध्यक्ष दिनेश शिरीषकर यांच्यासह पदाधिकारी, विभागप्रमुख व समाजबांधव उपस्थित होते. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे, असा परिवार आहे.










