Development festival at Nandos village on the occasion of Union Minister Narayan Rane’s birthday
५० लाख विकास निधीतुन ८ विकास कामांचा शुभारंभ ; उपसरपंच विजय निकम यांची संकल्पना
मालवण | प्रतिनिधी : कोकणचे भाग्यविधाते केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नांदोस गावचे उपसरपंच विजय निकम यांच्या संकल्पनेतून विकास महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.
नांदोस ग्रामपंचायत क्षेत्रात एकूण ५० लाख रुपयांचा विकास निधी असलेल्या एकूण ८ विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी सरपंच सौ. माधुरी चव्हाण, उपसरपंच विजय निकम, ग्रा.पं.सदस्य अंकुश गावडे, सौ . ऋतुजा माळकर, कोमल कदम, सौ. वैशाली घाडीगांवकर, सौ. गौरी पारकर, सागर नांदोसकर, निलेश पेडणेकर, सौ. ज्योती पेडणेकर, सुशांत चौगले ( ग्रामसेवक), हेमंत माळकर, यशवंत चव्हाण, नितीन नांदोसकर, विध्याधर पार्टे, गणेश पार्टे, विनोद पार्टे, शैलेश बिबवणेकर, सौ. मिनल पार्टे, दिगंबर गावडे, राजन गावडे, भिकाजी गावडे, संभाजी गावडे, अशोक गावडे व अन्य ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.












