वेंगुर्ला : प्रतिनिधी
अपघात प्रकरणातील संशयीत आरोपी अक्षय मिलिद मंत्री (रा.आरवली) याची वेंगुर्ला दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश डी.वाय.रायरीकर यांनी सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली. संशयीत आरोपीच्यावतीने अॅड. मनिष सातार्डेकर यांनी काम पाहिले.
फिर्यादी अनिकेत प्रमोद गांवकर (कणकवली-कसवण) ६ नोव्हेंबर २०१८ रोजी कणकवली येथून रेडी येथे मामासोबत मामाच्या मित्राच्या घरी गेलो होता. परत येतेवेळी फिर्यादी व संशयीत आरोपीच्या दुचाकीची मोचेमाड घाटी येथील वळणावर सायंकाळच्या सुमारास अपघात झाला. यात फिर्यादी, त्याचा मामा व आरोपी यांना गंभीर दुखापात झाली. या अपघातास संशयीत आरोपी जबाबदार आहे अशी फिर्याद फिर्यादी यांनी वेंगुर्ला पोलिसात दिली होती. त्यानुसार संशयीत आरोपीच्या विरूद्ध गुन्हा दाखल झाला होता व संशयीताची जामिनावर मुक्तता करण्यात आली होती.
दरम्यान, या प्रकरणी साक्षी पुरावे तसेच साक्षीदार तपासून व संशयीत आरोपीच्यावतीने अॅड.मनिष सातार्डेकर यांनी आरोपीची मांडलेली बाजू योग्य मानून व आरोपीच्यावतीने केलेला युक्तीवाद ग्राह्य मानून आरोपी विरूद्ध गुन्हा शाबीत होत नसल्याच्या कारणाने संशयीत आरोपी याची सबळ पुराव्या अभावी २० जून रोजी निर्दोष मुक्तता केली.











