*माखजन |वार्ताहर* संगमेश्वर तालुक्यातील माखजन व चिपळूणातील प्रथितयश किराणा मालाचे व्यापारी कै.चंद्रकांत उर्फ चंदू शेठ खरे यांच्या पत्नी जयश्री खरे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.त्या ७६ वर्षांच्या होत्या. चिपळूण रावतळे येथील त्यांच्या निवास स्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
चिपळूणातील नवकोकण एजुकेशन सोसायटीचे खजिनादर संजीव खरे व राजीव खरे यांच्या त्या मातोश्री होत.जयश्री खरे या त्यांच्या मनमिळावू,जिद्दी,परोपकारी वृत्तीमुळे माखजन सह चिपळूण भागात सुपरिचित होत्या.त्यांच्या निधनाची बातमी कळताच शेकडोंच्या संख्येने लोकांनी अत्यंदर्शन घेतले.त्यांच्या निधानाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.











