खेड(प्रतिनिधी)
गेल्या दोन दिवसा पासून सुरू असलेल्या पावसाने शुक्रवारी रात्री कहर केला पडलेल्या मुसळधार पावसाने जगबुडी नदीसह चोरद व नारिंगी या नद्यांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ होऊन शनिवारी सांयकाळ पर्यत यातील जगबुडी नदी ने इशारा पातळी ओलांडून वाहत होती. मात्र रात्री ८ वाजता नदीच्या पाणी पातळीमध्ये घट झाली होती.
गेले दोन दिवस तालुक्यात तूफान पाऊस पडत आहे मात्र शुक्रवारी रात्री सलग कोसळणाऱ्या पावसाने कहर केला यामुळे जगबुडी नदी पात्रा तील पाणी इशारा पातळी सोडून ५.२० मीटर इतकी वाहत होती शनिवारी दुपार नंतर पावसाने काहीशी उसंत घेतली आहे त्या मूळे पाण्याची पातळी मात्र स्थिर होते. पावसा चा जोर वाढल्यास धोका पातळी असलेल्या ७ मीटर ही पातळी पार करण्याची भीती होती. त्यामुळे नदी काठच्या गावां सह शहर वासीयांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले होते, मात्र आता पाणी पातळीत घट झाल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.









