एस. आय. सेकेडरी स्कूल के ज्यु. कॉलेज फुरुस मध्ये शिक्षण सप्ताह साजरा

खेड(प्रतिनिधी) केंद्रशासनाच्या आदेशान्वये   तालुक्यातील  एस्. आय, सेकंडरी स्कूल ज्यु. कॉलेज  फुरुस येथे शिक्षण सप्ताह कार्यक्रम  उत्साहात पार पडला
शिक्षण सप्ताह कार्यक्रमांतर्गत  २२ ते २८ जुलै या कालावधीत शासन आदेशान्वये अनेक कार्यक्रम घेण्यात आले. त्यामध्ये शिक्षणात माहिती तंत्रज्ञानाचा वापर, शैक्षणिक साहित्य निर्मीती, सांस्कृतिक कार्यक्रम, इको क्लब स्थापन करणे, वृक्षारोपण व क्रिडा दिन, तिथी भोजन असे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
 या कार्यक्रमांमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहात सहभाग घेतला काही कार्यक्रम शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी स्वतः नियोजन करून पार पाडले. या कार्यक्रमांमध्ये पालकांचाही सहभाग  होता. शेवटच्या दिवशी शिक्षणाची महत्व सांगणारी जनजागृती साठी प्रभात फेरी काढण्यात आली  तसेच ज्या संस्था व प्रतिष्ठीत यांनी शाळेला, सहकार्य केले त्यांचे आभार मानण्यात आले व तिथीभोजनाचे आयोजन केले यामध्ये विदयार्थ्याना सकस व गोड आहार देण्यात आला