राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार महिला प्रदेश उपाध्यक्ष पदी वेंगुर्लेतील नम्रता कुबल यांची निवड

वेंगुर्ले : दाजी नाईक
महाराष्ट्र प्रदेश नॅशनॅलिस्ट महिला काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पार्टीच्या उपाध्यक्ष पदी वेंगुर्ले नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा सौ.नम्रता कुबल यांची नियुक्ती केल्याचे पत्र पक्षाच्या महिला अध्यक्षा ॲड.रोहिणी एकनाथ खडसे यांनी सौ.कुबल यांना दिले.

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. खा. श्री. शरदचंद्रजी पवार साहेब, महिलांच्या राष्ट्रीय अध्यक्षा मा. खा. श्रीमती फौजियाताई खान, प्रदेशाध्यक्ष मा. आ. श्री. जयंतराव पाटील साहेब व नेत्या मा. खा. सौ. सुप्रियाताई सुळे यांना अभिप्रेत असणारी संघटना बांधण्यासाठी आपण प्रयत्नशील रहाल अशी पक्षाला खात्री आहे.

समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन पक्ष मजबूत करण्यासाठी, पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्यां पर्यंत पोहचविण्यासाठी आपले सहकार्य राहील असा विश्वास असल्याचे या नियुक्तीपत्रात म्हटले आहे. दरम्यान या नियुक्ती नंतर ॲड.रोहिणी खडसे यांनी सौ.कुबल यांचे खास अभिनंदन केले. यावेळी पक्षाच्या महिला कोकण प्रदेश अध्यक्ष सौ. अर्चना घारे, महिला सिंधुदुर्ग अध्यक्ष सौ. रेवती राणे आणि अन्य महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. त्यांनीही सौ. कुबल यांचे अभिनंदन केले.