खेड(प्रतिनिधी) खेड तालुक्यातील गुणदे ग्रामपंचायतीने माझी वसुंधरा या अभियानांतर्गत पर्यावरण पूरक गणेश मूर्तींचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आत्तापासूनच कंबर कसली आहे. ग्रामपंचायत कार्यकारिणीसह गावातील ग्रामस्थ महिलांनी घरोघर जाऊन पर्यावरण पूरक गणेश मूर्तींचा प्रचार व प्रसार केला.
ग्रामपंचायत गुणदेचे सरपंच श्री. रविंद्र यशवंत आंब्रे, उपसरपंच सौ.संध्या संदीप कांदेकर, ग्राम विकास अधिकारी सौ.आरती जयवंत मोरे ,ग्रामपंचायतचे सर्व सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली गावात नेहमीच विविध समाजोपयोगी उपक्रम आणि विकास कामे केली जात असतात. या उपक्रमांबरोबरच ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत पर्यावरण पूरक गणेश मूर्तींचा प्रसार आणि प्रचार गावातील महिलांनी घरोघर जाऊन केला. यासाठी ग्रामपंचायतीच्या सर्व कार्यकारिणीचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. यावेळी या महिलांबरोबर गावातील ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत कार्यकारिणीचे सर्व सदस्य उपस्थित होते.











