“Meech Rani Paithanichi” program at Aravli in excitement: dance cheers, lucky draw colors the program…
भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा शिरोडा, आरवली, सागरतीर्थ, रेडी चे आयोजन
वेंगुर्ले | प्रतिनिधी : आरवली येथे साळगांवकर हाॅल मध्ये झालेल्या “मीच राणी पैठणीची” सोबत नृत्य जल्लोष, लकी ड्राॅ अशा विविध कार्यक्रमांना महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. भारतीय जनता पार्टी शिरोडा, आरवली, सागरतीर्थ, रेडी भाजपा महिला मोर्चा यांच्या वतीने हा कार्यक्रम करण्यात आला.केद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त विशाल सेवा फाऊडेशन पुरस्कृत व प्रितेश राऊळ मित्रमंडळ, सुहास गवंडळकर- भाजपा वेंगुर्ला तालुका अध्यक्ष यांच्या सहयोगाने झालेल्या महिलांसाठीच्या या खास कार्यक्रमात विशाल सेवा फाउंडेशन चे संस्थापक श्री विशालजी परब, माजी आरोग्य व शिक्षण सभापती प्रीतेश राऊळ, भाजप महिला तालुका पदाधिकारी सौ वृंदा गवंडळकर अध्यक्षपदी व प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा वेंगुर्ला तालुका महिला अध्यक्षा सौ स्मिता दामले, अँड. सुषमा खानोलकर, आजगाव सरपंच सौ यशश्री सौदागर, रेडी उपसरपंच सौ नमिता नागोळकर, आरवली उपसरपंच सौ रिमा मेस्त्री, सौ अक्षता परब तसेच शिरोडा, रेडी, आरवली, सागरतीर्थ ग्रामपंचायत च्या महिला सदस्या उपस्थित होत्या.
अध्यक्ष व प्रमुख पाहुण्याच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन व देवी सरस्वती मूर्तीस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात पसायदानाने करण्यात आली.मीच राणी पैठणीच्या कार्यक्रमात महिलांनी घेतलेला सहभाग उत्स्फूर्त होता, रंगतदार झालेल्या स्पर्धेत प्रथम क्रमांक विजेत्या कु.अंकिता मातोंडकर , द्वितीय क्रमांक विजेत्या सौ.दिव्या कामत, तृतीय क्रमांक विजेत्या सौ. विदया नवाथे व चतुर्थ क्रमांक विजेत्या प्रियांका कुडव यांना मान्यवरांच्या हस्ते मानाची पैठणी,सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.विशाल सेवा फाउंडेशन चे संस्थापक श्री विशाल परब यांनी कार्यक्रमास उपस्थित राहून शुभेच्छा देताना शिरोडा पंचक्रोशीमध्ये याही पेक्षा मोठा असा पर्यटन महोत्सव सारखा कार्यक्रम लवकरच करू असे आश्वासन दिले. तर कार्यक्रमाच्या निमित्ताने माजी आरोग्य व शिक्षण सभापती प्रीतेश राऊळ यांनी रेडी जि प गट विभागात व जिल्ह्यामध्ये केलेली विकासकामे व आदर्शवत कार्यासाठी त्यांना भाजपा शिरोडा ,रेडी आरवली , सागरतीर्थ वतीने शाल श्रीफळ व आकर्षक भेट वस्तू देऊन गौरविण्यात आले.
केद्रीय मंत्री,खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसा च्या औचित्याने झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी ना. नारायणराव राणे यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला तसेच रेडी उपसरपंच सौ नमिता नागोळकर यांचा वाढदिवस साजरा करून शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमासाठी आरवली ग्रामपंचायत सदस्या सायली कुडव, शिरोडा ग्रामपंचायत सदस्या हेतल गावडे, जयमाला गावडे, अर्चना नाईक, अनन्या घाटवळ, शिरोडा ग्रामपंचायत माजी सदस्या समृद्धी धानजी, सागरतीर्थ ग्रामपंचायत सदस्या गायत्री गोडकर,शिरोडा भाजप महिला मोर्चा पदाधिकारी संध्या राणे, गंधाली करमळकर, मनीषा भोपाळकर, जान्हवी आजगांवकर, स्नेहा गोडकर, सागरतीर्थ भाजप महिला पदाधिकारी पूजा बागकर, समिधा वस्त, वृंदा वस्त,अनुराधा मोठे, आरवली भाजप महिला मोर्चा पदाधिकारी विदया नवाथे, नंदिनी आरोलकर, सावरी शेलटे, अक्षता नाईक,अर्पिता रगजी, ममता मेस्त्री, पल्लवी नाईक,रेडी भाजप महिला मोर्चा पदाधिकारी श्रध्दा धुरी, उपस्थितीत होते.
त्याच बरोबर भाजप वेंगुर्ला तालुका उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कर्पे, शिरोडा गावचे माजी सरपंच मनोज उगवेकर, माजी उपसरपंच राहुल गावडे, भाजप शिरोडा पदाधिकारी व शिरोडा तंटामुक्ती अध्यक्ष मनोहर होडावडेकर, रेडी सरपंच रामसिंग राणे, ग्रामपंचायत सदस्य आनंद भिसे, रेडी शक्ती केंद्र प्रमुख जगन्नाथ राणे, भाजप रेडी पदाधिकारी महेश कोनाडकर, शिरोडा ग्रामपंचायत सदस्य मयूरेश शिरोडकर, सुधीर नार्वेकर,भाजप शिरोडा शहर अध्यक्ष श्रीकृष्ण धानजी, उपाध्यक्ष संतोष अणसूरकर, युवा अध्यक्ष सोमाकांत सावंत,भाजप शिरोडा पदाधिकारी अनुक्रमे जितेंद्र आजगांवकर,योगेश वैदय,दादा शेटये,विश्वनाथ नाईक,विकास परब,चंद्रशेखर गोडकर,अनिल गावडे,बाबल गावडे,शिरोडा शक्ती केंद्र प्रमुख विदयाधर धानजी, शिरोडा माजी सरपंच विजय पडवळ, आरवली सरपंच तातोबा कुडव, ग्रामपंचायत सदस्य समीर कांबळी, भाजप आरवली भाजप पदाधिकारी रवींद्र कुडाळकर, संतोष मातोंडकर,आरवली शक्ती केंद्र प्रमुख महादेव नाईक, आसोली शक्ती केंद्र प्रमुख विजय बागकर,सागरतीर्थ भाजप पदाधिकारी बाळू वस्त,सचिन वस्त या सर्व मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन स्वरांगी उगवेकर व प्रस्तावना हेतल गावडे यांनी केली
जिल्ह्यातील सुप्रसिद्ध गायक समीर चराटकर यांनी पैठणी कार्यक्रमाचे अप्रतिम सादरीकरण करताना गीत गायन करून कार्यक्रमास रंगत आणली. त्याचप्रमाणे नृत्य कलाकार सायली राऊळ, भक्ती जामसंडेकर, ईशा गोडकर, समर्थ गवंडी व कु. प्रांजल आजगावकर यांनी नृत्य जल्लोष कार्यक्रमाद्वारे नृत्य सादरीकरण करून प्रेक्षकांची मने जिंकली. कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणून लकी ड्रॉ स्पर्धेत प्रथम विजेत्या संध्या राणे, द्वितीय उज्वला आरोलकर, तृतीय स्वरांगी उगवेकर व चतुर्थ गायत्री चिपकर याना आकर्षक भेट वस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. महिलांतर्फे सन्मान म्हणून प्रमुख पाहुण्यांचा शाल श्रीफळ देऊन तसेच जिजाऊ ग्राम संघ अध्यक्षा हर्षा परब, राणी लक्ष्मीबाई ग्रामसंघ अध्यक्षा उत्कर्षा मोरजे, हिरकणी ग्रामसंघ अध्यक्षा गंधाली करमळकर व कार्यक्रमात सहभागी सर्व कलाकारांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.