वापर व फायदा बाबत दिली शेतकऱ्यांना माहिती
सावंतवाडी । प्रतिनिधी : उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे मधील ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रम २०२४ अंतर्गत शेतकऱ्यांच्या मार्गदर्शना साठी आलेल्या कृषीदुतांकडून “किटक नाशक सापळे प्रात्यक्षिक” पार पाडण्यात आले. या प्रात्यक्षिका द्वारे शेतकऱ्यांना विविध प्रकारचे किटक नाशक सापळे तसेच त्यांचा वापर आणि फायदे इन्सुली ग्रामस्थांना तथा शेतकऱ्यांना पटवून दिले.
यामध्ये डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीने निर्माण केलेले रक्षक सापळे, चिकट सापळे व प्रकाश सापळे यान बद्धल माहिती दिले. ह्या कार्यक्रमास शेतकऱ्यांनी चांगला सहभाग नोंदवला तसेच तालुका कृषी पर्यवेक्षक यशवंत घवाने व माजी उपसरपंच रामचंद्र चराटकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली व यशवंत घवाने यांनी मोलाचे मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.अशाच प्रकारचे अनेक कार्यक्रम येणाऱ्या दिवसांनमध्ये इन्सुली, ता. सावंतवाडी मध्ये ह्या कृषीदुतांकडून पार पडतील.
सदर गटामध्ये प्रियश राघोबा धुरी, मल्हार संदिप महाजन, हर्षल अरुण पाटील, श्रेयस जयंत गायकवाड, ओवेश गुलाम मिर्झा नाडकर, नंदन आर, सौरजो किरण चौधरी या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.











