रत्नागिरीमधील वकील वर्गाचा निरंजन डावखरे यांना पाठिंबा

 

 

*रत्नागिरी* : कोकण पदवीधर मतदारसंघाचे भाजपा महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांनी रत्नागिरी वकील संघटनेतील मतदारांना भेटून वकिलांच्या समस्या जाणून घेतल्या आणि मतदान करण्याचे आवाहनही केले. या वेळी डावखरे यांनी वकिली सोडून नकळत राजकारणाच्या प्रवाहता खेचला गेलो. मतदार संघात पाच जिल्हे आहेत. यात सर्व जिल्ह्यांचे प्रश्न भिन्नभिन्न आहेत. पालघर हा ग्रामीण भाग आहे. नवी मुंबई, कल्याणमध्ये शिक्षणाचा प्रश्न वेगळा आहे, असे सांगितले.

 

प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण, प्रत्येक शाळा डिजिटल करण्याकडे लक्ष दिले. प्रत्येक शाळेला कॉम्प्युटर उपलब्ध करून दिले आणि जगाच्या पाठीवर कुठे काय घडतं आहे याचं ज्ञान विद्यार्थ्यांना मिळालं पाहिजे, यासाठी प्रयत्न केल्याचेही निरंजन डावखरे यांनी सांगितले. त्याचबरोबर कोकणातील मुलं हुषार आहेत. परंतु प्रशासकीय अधिकारी वर्गामध्ये ते मागे पडतात त्यासाठी त्यांना यूपीएससी आणि एमपीएससीचे शिक्षण देण्यासाठी शैक्षणिक संस्थातून असे प्रशिक्षण देण्याची गरज आहे, असे डावखरे यांनी सांगितले.

 

हा मेळावा भाजपचे नेते आणि अधिवक्ता परिषदेचे जिल्हाध्यक्ष ॲड. भाऊ शेट्ये यांनी आयोजित केला होता. या मेळाव्याला भाजपाचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, माजी आमदार बाळ माने, बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. विलास पाटणे, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, ॲड. दीपक पटवर्धन यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. तसेच ॲड. विजय साखळकर, ॲड. फजल डिंगणकर, ॲड. धनंजय भावे, ॲड. एस. ए. भावे. ॲड. राजशेखर मलुष्टे, ॲड. प्रिया लोवलेकर, ॲड. विनय आंबुलकर, ॲड. सौ. शाल्मली आंबुलकर, ॲड. रत्नदिप चाचले, ॲड. अवधूत कळंबटे, ॲड. नीलम शेवडे, ॲड. आशिष घोसाळे, ॲड. आशिष बर्वे, ॲड. रोहित देव यांच्यासह वकील शंभरहून अधिक मतदार उपस्थित होते.