२६ ते २८ दरम्यान रत्नागिरीत तपासणी
रत्नागिरी : लांजा येथील इन्फिगो आय केअर हॉस्पीटलमध्ये उद्या दि. २५ जून रोजी रेटिनातज्ज्ञ डॉ. प्रसाद कामत रेटिना रुग्णांची तपासणी करणार आहेत. तसेच रत्नागिरीतील इन्फिगो हॉस्पीटलमध्ये २६ ते २८ जूनदरम्यान रेटिना रुग्णांची तपासणी, शस्त्रक्रिया उपचार करण्यात येणार आहे. या करिता पूर्वनोंदणी करावी, असे आवाहन इन्फिगो आय केअरतर्फे केले आहे.
४० वर्षे पूर्ण झाली असल्यास, अचानक नजर कमी होणे, डोळ्यांपुढे काळे ठिपके असणे, डायबेटीस असल्यास, चष्म्याचा नंबर सतत बदलत असल्यास आणि मायनस ३ पेक्षा जास्त नंबरचा चष्मा असल्यास अशांनी रेटिना तपासणी करून घेणे आवश्यक आहे. त्याकरिता डॉ. कामत हे गेल्या साडेतीन वर्षांपासून रत्नागिरीमध्ये तपासणी करत आहेत.
इन्फिगो आय केअर हॉस्पिटल रत्नागिरी येथे ग्रीन लेझर, डायमेन्शनल ऑप्टिकल टोपोग्राफी, फिल्ड ॲनालायझर ,अर्टली मशीन अशी अत्याधुनिक निदान यंत्रणे असून या द्वारे रेटीनाच्या समस्यांची अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने तपासणी केली जाते. हा विभाग रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यातील एकमेव सुसज्ज विभाग आहे.
आतापर्यंत साडेतीन वर्षांत इन्फिगो आय केअर हॉस्पीटलमध्ये १ लाख ३ हजार रुग्णांची तपासणी केली. रेटिनाच्या १४ हजार रुग्णांची तपासणी करण्यात आली. तसेच ८०० हून अधिक शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यात काही शस्त्रक्रिया क्लिष्ट स्वरूपाच्या होत्या. तसेच साडेतीन वर्षांमध्ये ८०० मोफत नेत्रतपासणी शिबिरांचे आयोजन करून त्यात ४० हजारांहून अधिक रुग्णांची तपासणी केली. जवळपास साडेचार कोटी रुपये धर्मादाय पद्धतीने म्हणजे नेत्रतपासणी व शस्त्रक्रियांमध्ये दान केले आहेत, अशी माहिती इन्फिगोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीधर ठाकुर यांनी दिली.











