
वीजवाहिन्या तुटल्या : महावितरणची बत्ती गूल
सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी ओटवणे मार्गावर कशाळीकर गॅरेजच्या समोर असलेला जुनाट जीर्ण वृक्ष पावसासह आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे कोसळला. कोसळला. मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घटना घडली.
सदर वृक्षाच्या फांद्या पार्किंग करून ठेवलेल्या दुचाकी व अन्य गाड्यावर पडल्यामुळे गाड्यांचे मोठ्या नुकसान झाले. तर हा वृक्ष वीज वाहिन्यांवर पडल्यामुळे वाहिन्या तुटल्या त्यामुळे या परिसरातील महावितरणची बत्ती गुल झाली. हा वृक्ष त्वरित हटवावा अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.











