वरवेली गावातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक योगेंद्र बाळकृष्ण विचारे व कुटुंबीयांच्या वतीने विविध साहित्य वाटप

मोडकाआगर | वार्ताहर : गुहागर तालुक्यातील वरवेली गावातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक योगेंद्र बाळकृष्ण विचारे व कुटुंबाच्या वतीने विविध साहित्यांचा वाटप करण्यात आले. प्रवासी व भक्तांना बसण्यासाठी स्टीलच्या बाकडे व धोक्याच्या वळणावर समोर येणारे वाहने दिसण्यासाठी आरसे हे सर्व साहित्य त्यानी आपले वडील कै. बाळकृष्ण लक्ष्मण विचारे, आई कै. शुभांगी बाळकृष्ण विचारे, बहीण कै. सुहासिनी सूर्यकांत गुजर, कै .श्रुती जयेश लंगालिया, कै. सुमती बाबुराव सुर्वे, कै. यशवंत आबाजी विचारे यांच्या स्मरणार्थ साहित्य देण्यात आले.

 

प्रवाशांना बसण्यासाठी मोडकाआगर एसटी स्टँड येथे २, मोडकाआगर रिक्षा स्टँड येथे २, वरवेली ग्रामपंचायत कार्यालय समोर १, श्री हसलाई देवी मंदिर वरवेली १ असे एकूण ६ स्टीलचे बाकडे त्याचप्रमाणे वरवेली फाटा व वरवेली आतील रस्त्याच्या धोक्याच्या वळणावर समोर येणारे वाहने दिसण्यासाठी आरसे ही त्यांनी लावले आहेत. त्यांच्या या विशेष कार्याबद्दल गुहागर नगरपंचायत, वरवेली ग्रामपंचायत, श्री हसलाई देवी देवस्थान वरवेली, मोडका आगर रिक्षा संघटना व प्रवासी व वरवेली गावाच्या वतीने त्यांचे विशेष आभार मानण्यात आले त्यांनी यापुढेही असेच कार्य सुरू ठेवावे अशा शुभेच्छा देण्यात आल्या.