रत्नागिरी : कोकण पदवीधर मतदार संघासाठी सुरु झालेल्या मतदानामध्ये दुपारी १ वाजेपर्यंत ३५.६५ टक्के मतदान झाले आहे.
भाजप महायुतीचे उमेदवार विद्यमान आमदार निरंजन डावखरे आणि काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश किर यांच्या प्रमुख लढत आहे. दुपारी १ वाजेपर्यंत मतदार संघात ३५.६५ % इतके मतदान झाले होते. त्यामध्ये समाविष्ट पालघरमधे ३३.१२%, ठाणे जिल्ह्यात ३४.६६%, रायगड जिल्ह्यात ३५.७०%, रत्नागिरीमध्ये ३५.३९% तर सिंधदुर्ग जिल्ह्यात ४५.००% मतदान झाले आहे.
तर याच निवडणूक प्रक्रियेतीलमुंबई पदवीधर मतदार संघासाठी १ वाजेपर्यंत ३८.४०% तर मुंबई शिक्षक मतदार संघासाठी १ वाजेपर्यंत ४०.४८% मतदान पार पडले आहे.









